सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे, मात्र बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली असून, सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात एक व्यक्ती शाळकरी मुलांना देशप्रेमाबद्दल समजावून सांगत असते. या वेळी एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नावर भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करीत होते, असे नमूद करण्यात आले आहे. ब्राह्मण महासंघाने या चुकीकडे लक्ष वेधले असून, ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरित कारवाई करावी,
अशी मागणी केली आहे.