Breaking News

तटकरे कुटुंबीयांना घरी बसवणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना

श्रीवर्धन : प्रतिनिधी

सुनील तटकरे यांनी आजपर्यंत केलेल्या पापाचा घडा या विधानसभा निवडणुकीत फोडून आम्ही येथील जनतेला न्याय देणार आहोत. त्यांना त्यांच्या कुंटुंबासह घरात बसविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी श्रीवर्धनमध्ये दिला.

शिवसेना, भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धनमधील राऊत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी विनोद घोसाळकर हा तगडा शिवसैनिक दिला आहे, त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रमोद घोसाळकर, अवधुत तटकरे कुंटुंब आपल्याकडे आले. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. या हक्काच्या सरकारमध्ये आपला हक्काचा आमदार निवडून द्या, अशी साद त्यांनी मतदारांना घातली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, उमेदवार विनोद घोसाळकर, माजी खासदार अनंत गीते, माजी आमदार तुकाराम सुर्वे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, प्रतोष कोळथरकर, रवी मुंढे, विजयराव खुळे, राजू चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply