


पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कामोठे येथील विविध सोसायटीमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. कामोठेमधील ग्रीन स्केप रॉयल सोसायटी, नंदनवन पार्क सोसायटी, इंद्रविहार सोसायटी मानसरोवर कॉम्प्लेक्स, डिसिल्व्हा कॉम्प्लेक्स, साईसागर बिल्डिंग, कृष्णा अपार्टमेंट येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी कामोठ्याचे भाजप सरचिटणीस विनोद आटपाडकर, आनंद जाधव आणि मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र जवळ, दादासो शिवाजी मदने, सुरेंद्र सिंग, नन्हे शुक्ला, तानाजी शिरोडकर, शिवाजी माटेकर, सुभाष पोतदार, शंकर मोरे, कमलाकर भोईर, श्री. तांबे, अनिल चौधरी, संजय निनावे, विजय रेडकर, रत्ना चव्हाण, वंदना शिंदे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजप नेते भीमसेन माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.