Breaking News

कमलनाथांच्या भाच्याने एका रात्रीत उडविले 7.8 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर्स म्हणजेच सात कोटी आठ लाख रुपये उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडचेही नाव आहे. ईडीच्या आरोपपत्रात पुरीचा राजेशाही थाट उघड झाला आहे.

ईडीने रतुल पुरीविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार रतुल पुरी परदेशातील अनेक हॉटेलांमध्ये थांबला होता, हे त्याने केलेल्या पैशांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

यादरम्यान अमेरिकेतील प्रोव्होकेटर नावाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्रीत त्याने सात कोटी आठ लाख रुपये उडवल्याचे निष्पन्न झाले आहे. याबरोबरच नोव्हेंबर 2011 आणि ऑक्टोबर 2016दरम्यान पुरीने स्वत:च्या मौजमजेसाठी सुमारे 32 कोटी रुपये खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.

(अधिक वृत्त पान 2 वर..)

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply