पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार आणि पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील मरण पावलेल्या कोविड रुग्णांवर विद्युतदाहिनी अथवा लाकडाच्या सहाय्याने विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी झाली होती. उपचारासाठी तर पैसे खर्च होतच होते, परंतु दुर्दैवाने रुग्णाचे निधन झाले तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचीसुद्धा एैपत नसल्याचे काही उदाहरणावरून दिसून आले.
या सर्व परिस्थितीचा विचार करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका आयुक्तांच्या मार्फत महापालिकेला एक पत्र लिहून कोविड आजारामुळे निधन झालेल्या रुग्णांवर महापालिकेने पोदी आणि अमरधाम या दोन्ही स्मशानभूमीत विद्युतदाहिनी अथवा लाकडाचा वापर करून विनामूल्य अंत्यसंस्कार करावे, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीनेही मरण पावलेल्या कोविड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करावे असा ठराव केला होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने पोदी आणि अमरधाम स्मशानभूमीत कोविड मृतांवर विनामूल्य अंत्यसंस्कार सुरू केले आहेत. महापालिकेच्या नियमानुसार पोदी आणि अमरधाम या दोन्ही स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमार्फत अंत्यसंस्कार करण्यासाठी अडीच हजार रुपये लागत होते, तर लाकडाच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेचार ते पाच हजार रुपये खर्च येत होता, पण आता कोविडमुळे मरण पावलेल्यांवर विद्युतदाहिनी अथवा लाकडांमार्फत विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …