Breaking News

खारघरमध्ये शेकापला खिंडार

पनवेल ः वार्ताहर

पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या खारघर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला. त्यामुळे खारघरमध्ये शेकापक्षाला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील, खारघर शहरप्रमुख शंकर ठाकूर, युवासेना रायगड समन्वयक नितीन पाटील, महिला आघाडी विधानसभा संघटक रेवती सकपाळ, तालुका संघटक सुजाता कदम, उपमहानगर संघटक रिना पाटील आदींच्या उपस्थितीत शेकाप खारघर शहराध्यक्ष कैलास गोमा म्हात्रे, गुरूनाथ म्हात्रे, ममता म्हात्रे, महिला अध्यक्षा मेघा जयकर, परवीन घाडी, आदिल पटेल, वसंत म्हात्रे, विलास म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अजय भोईर, रोहिदास म्हात्रे, मनोहर म्हात्रे, राहुल म्हात्रे, वैशाली पाटील, कमला शहा, रूपाली कवळे, सायरा बानू अन्सारी, सना शमुद्दीन शेख, जरीनबी मोहम्मद शेख, पूजन ठाकूर, शुभम ठाकूर, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगवा हाती घेतला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply