Breaking News

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांच्या लसीकरणास गती

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणास वेग प्राप्त झाला आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरणही गतीने होत आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने होत असलेल्या लसीकरण मोहिमेस विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक कार्यवाही केल्यामुळे लसीकरणास गती प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन प्रतिबंधक लस देण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या आरोग्य अधिकारी डॉ. आरती गुप्ते यांनी दिली.

या लसीकरण मोहिमेच्या वेळी प्राचार्या साधना डोईफोडे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आरोग्य अधिकारी डॉ. आरती गुप्ते, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांच्यासह उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, आरोग्य सहाय्यक सुलभा खाडे व रंजना गायकवाड तसेच आरोग्य मदतनीस हिरकण्या कोळी, डेटा ऑपरेटर हर्षल पवार व जगदिश कदम, विद्यालयाच्या परीक्षा विभाग प्रमुख चित्रलेखा पाटील, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, संगीत विभाग प्रमुख सुनील गावंड, आरोग्य विभाग प्रमुख एकनाथ ठाकूर व प्रा. राजेंद्र चौधरी व विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर आदी उपस्थित होते.

लसीकरण मोहीम अधिक गतिमान व यशस्वी करण्यासाठी क्रीडाप्रमुख जयराम ठाकूर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर व सर्व वर्ग शिक्षक विशेष परिश्रम घेत आहेत.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply