Breaking News

प्रामाणिक कर्तव्यपूर्तीची फलप्राप्ती : कोहली

रांची : वृत्तसंस्था

समोरील प्रतिस्पर्धी कोणताही असो, परंतु प्रामाणिकपणे प्रत्येक खेळाडूने आपले कर्तव्य निभावल्यामुळेच भारतीय संघ आज यशाची शिखरे सर करीत आहे, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आफ्रिकेला कसोटी मालिकेत 3-0 अशी धूळ चारली. त्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता.

‘जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे संघभावनेशी एकनिष्ठ राहून आमचे कर्तव्य बजावत राहू, तोपर्यंत असे अनेक विजय सहज आमच्या पदरी पडतील. विश्वात सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनण्याच्या दिशेनेच आम्ही 2014मध्ये सुरुवात केली होती. ते स्वप्न आता साकार होत असल्याने निश्चितच फार समाधानी वाटत आहे,’ असे कोहली म्हणाला.

‘सध्याच्या संघातील प्रत्येक खेळाडूत सामना जिंकवण्याची क्षमता आहे. विशेषत: खेळपट्ट्यांवर निर्भर राहण्याची प्रथा आम्ही मोडीत काढली असून, स्वत:च्या कामगिरीद्वारे अनुकूल निकाल मिळवले आहेत. रोहित, मयांक, नदीम यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले, तर गोलंदाजांनी मला कधीच निराश केले नाही. त्यामुळेच कर्णधार म्हणून या संघाचा मला अभिमान वाटतो. परदेशातील दौर्‍यांवरही आम्ही अशीच कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असेही 30 वर्षीय कोहलीने सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply