Breaking News

अभिषेक नायर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेला डावखुरा फलंदाज अभिषेक नायर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय नायरने मुंबई रणजी संघात खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळाली होती, तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सहारा पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

अभिषेक नायरने मुंबई रणजी संघाकडून 99 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. 2017-18च्या सत्रात मात्र त्याला मुंबईच्या संघातून वगळण्यात आले. त्यानंतर तो पुदुच्चेरी संघाकडून चार सामने खेळला. त्यातील शेवटच्या सामन्यात त्याने सिक्कीमविरुद्ध 76 धावा केल्या आणि पाच गडी टिपले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीदेखील त्याला मिळाली होती, पण त्याने अतिशय खराब कामगिरी केली. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळू शकली नाही.

निवृत्तीसंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नायर म्हणाला की, मी प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकत आहे. माझ्या उमेदीच्या काळात आणि कठीण प्रसंगात मला साथ देणार्‍या क्रिकेट संघटनांचा, प्रशिक्षकांचा, संघातील सहकारी खेळाडूंचा, कुटुंबीयांचा आणि मित्र मंडळींचा आभारी आहेे.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply