कर्जत ः बातमीदार
माथेरान नगरपरिकडेे एक महिन्यापूर्वी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे अनेक प्रकार घडल्याने रुग्णवाहिकेमुळे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्याने मावळच्या खासदारांनी माथेरानकरांना आपल्या खासदार निधीतून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. मात्र येथील नगरपरिषदेने सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यास सुरुवात केल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशाला चाट पडत आहे. माथेरानमधील सर्वसामान्य रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवेतील अविभाज्य घटक असलेली रुग्णवाहिका सेवा उत्तम व वाजवी दरात मिळावी, या हेतूने खासदार निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा दर जेमतेम दाने ते तीन किमी अंतराकरिता 600 रुपये असा अवाजवी आकारल्यामुळे तसेच नागरिकांना ही अत्यावश्यक सेवा तात्काळ मिळण्यासाठी मुख्याधिकारी, डॉक्टर याना फोन केल्यावरच ही सेवा उपलब्ध होत असल्याने काही वेळेस मुख्याधिकारी व डॉक्टर यांना फोन लागत नाही. या प्रकारामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दर आकारणी संदर्भात माथेरानच्या लोकप्रतिनिधींनी दर कमी करण्यासंदर्भात ठराव संमत करून हा दर आटोक्यात आणणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आहे.