वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यामुळे बगदादीच्या खात्म्याच्या शक्यतेबाबत जगभरात चर्चा सुरू होती. अखेर खुद्द ट्रम्प यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत इसिसचा म्होरक्या बगदादी ठार झाला आहे. तो एका खंदकात लपून बसला होता. अमेरिकेच्या सैन्याने घेरल्यानंतर त्याने स्वतःसह आपल्या मुलांना भूसुरुंगाच्या सहाय्याने उडवून दिले, तो भेकड होता.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …