Breaking News

टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा सगळीकडेच आहे. तरीही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.

या शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या माध्यमातून व युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरास भाजप खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी देखील रक्तदान केले. शिबिराला भेट देण्यासाठी पनवेल मनपा स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक रामजी बेरा, अभिमन्यू पाटील, खारघर नागरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पंकज तितर, भाजप खारघर तळोजा मंडळ सरचिटणीस किर्ती नवघरे, दीपक शिंदे, पत्रकार गजानन चव्हाण यांसह अनेकांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप खारघर तळोजा मंडळ व युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, सहसचिव भरत कोंढाळकर, संदीप एकबोटे, दिनेश यादव, कुशल इंगळे यांनी मेहनत घेतली.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply