Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 27) ओमायक्रॉनबाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण परदेश दौरा करून आलेले आणि उर्वरित दोन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून चौघांना कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये, तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खारघरमधील चार आणि पनवेल शहरातील एक असे पाच रुग्ण ओमायक्रॉनने बाधित आढळले आहेत. हे रुग्ण द. आफ्रिका, दुबई, युनायटेड किंग्डम येथून आले आहेत. या रुग्णांच्या सोसायट्या सील केल्या असून हा भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवर महापालिका लक्ष ठेवून आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply