चंदीगड : वृत्तसंस्था
मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी (दि. 27) सलग दुसर्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जननायक जनता पक्षाचे (जजप) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा, अकाली दलाचे नेता प्रकाशसिंग बादल, सुखबीर बादल, दुष्यंत यांचे वडील अजय चौटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपला दुष्यंत यांच्या जेजेपीचा पाठिंबा मिळण्यामागे प्रकाशसिंग बादल यांची प्रमुख भूमिका असल्याचे मानले जात आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.