Breaking News

नेरळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला सुरुवात

कर्जत ः बातमीदार

नेरळ गावामध्ये गेली 56 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. यावर्षी 21 मार्च रोजी शिवजयंती उत्सव असून त्यानिमित्ताने रविवारी (दि.20)चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून जयंती उत्सवाला सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेने झाली. येथील बापूराव धारप सभागृहात आयोजित या दोन्ही स्पर्धांचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला समितीचे अध्यक्ष राहुल भाटकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

या वेळी उत्सव समितीचे उपाध्यक्ष देवेंद्र दाभणे, प्रथमेश घाटे, सचिव प्रीतम गोरी, हरिष पवार, खजिनदार प्रमोद कराळे, प्रतीक भिसे यांच्यासह कुणाल मनवे, कौस्तुभ गावकर, चिराग गुप्ता, अल्पेश मनवे, सूरज साळवी, परेश भोईर, ओंकार खोलमकर, दुर्वांकुर पवार, हर्ष खडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर शालेय मुलांनी चित्रकला स्पर्धेसाठी हजेरी लावली होती.

रांगोळी स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा सहभाग होता. श्रेया चंचे हिने स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांना काही टिप्स देखील दिल्या. या वेळी श्रेया चंचे हिने काढलेले चित्र कॅनडा देशातील हॉलिवूड अभिनेत्री यांनी खरेदी करून तिच्या चित्रकलेला दाद दिली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने श्रेया चंचे हिचा सत्कार नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला.

आरोग्य शिबिरात 170 रुग्णांची तपासणी

या वेळी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आयोजित आरोग्य शिबिरात 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. संतोष पोयेकर, डॉ. अमोल सातव, डॉ. संध्या शुक्ला यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली. काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया रायगड हॉस्पिटलकडून मोफत केल्या जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply