Breaking News

16 संघांना मिळाले विश्वचषक स्पर्धेचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियामध्ये 2020 साली होणार्‍या टी-20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेतील सगळे संघ आता निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी 20 क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित सहा संघांचे या स्पर्धेतील स्थान निश्चित झाले.

पात्रता फेरीतून सर्वप्रथम आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनी हे देश पात्र ठरले. त्यानंतर बुधवारी रात्री ओमान व स्कॉटलंड या दोन संघांनी टी-20 वर्ल्डकप 2020मधील प्रवेश पक्का केला. ओमानने अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगवर 12 धावांनी विजय मिळवली आणि टी-20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. तर स्कॉटलंडने युनायटेड अरब अमिरातीला (युएई) 90 धावांनी धूळ चारत टी-20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेतील स्थान निश्चित केले. यापैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी पहिल्यांदा टी 20 विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत.

पात्रता फेरीतून सहा संघांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला आहे. या पात्रता स्पर्धेची उपांत्य फेरी व अंतिम फेरी अद्याप बाकी आहे. त्यासाठी चुरस रंगणार आहे. शुक्रवारी होणार्‍या दोन उपांत्य फेरीच्या लढतीत आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनी वि. नामिबिया हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विजेत्यांमध्ये शनिवारी अंतिम लढत रंगणार आहे.

टी-20 वर्ल्डकप 2020च्या फॉरमॅटनुसार या सहा संघांना पहिल्या फेरीत दोन वेगवेगळ्या गटात क्रमवारीतील नवव्या आणि दहाव्या स्थानी असलेल्या संघांविरूद्ध खेळावे लागणार आहे. त्यानंतर या दोन गटातील सर्वाधिक गुण मिळवलेला प्रत्येकी 1 संघ आणि क्रमवारीतील 8 संघ यांच्यात ट्वेंटी-20 स्पर्धेचे मूळ सामने रंगणार आहेत.

थेट प्रवेश मिळालेले संघ : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, श्रीलंका (पात्रता फेरी खेळणारे संघ), बांगलादेश (पात्रता फेरी खेळणारे संघ),

पात्रता फेरीतून आलेले संघ : आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड,

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply