Breaking News

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत जाऊन सोमवारी (दि. 4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

24 ऑक्टोबर रोजी विधानसभेचे निवडणूक निकाल लागले. शिवसेनेला 56, तर भाजपला 105 जागा मिळाल्या. या सगळ्या सत्ता समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे, तर मुख्यमंत्रिपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घ्या, असे म्हटले होते. यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत अडचणी येत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे 170 आमदारांचे पाठबळ असल्याचेही सांगितले होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply