जिल्हा निवडणुकीत तीन जागांवर विजय
श्रीनगर : वृत्तसंस्था
एकवेळ अशी होती की काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच नव्हते. आज त्याच काश्मीर खोर्यात ’कमळ’ उमलले आहे. भाजपने जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत विजयाचे खाते उघडले आहे.
भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-2 आणि ऐजाज अहमद खान यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैल येथे विजय प्राप्त केला आहे. दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यात काकपोरा जागेवरही भाजपच्या मुन्ना लतीफ यांचा विजय झाला आहे. काश्मीर खोर्यातील विजय भाजपसाठी अत्यंत मोठा विजय मानला जात आहे. ऐजाज हुसैन यांनी आपल्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.