पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 24) करण्यात आले.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायतीच्या निधीतून कोविड लसीकरणासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर मंगळवारी लसीकरण केंद्र कार्यान्वित झाले. या केंद्राच्या माध्यमातून गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण, कोपर, शेलघर, बेलापाडा, शिवाजीनगर या गावांतील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या अंतर्गत मंगळवारी 200 नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात आला.
गव्हाण येथे सुरू झालेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते रघुनाथशेठ घरत, सरपंच माई भोईर, उपसरपंच अरुण कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनीता घरत, डॉ. प्रमिला माने, डॉ. धनाजी माने, डॉ. धीरज मेटकरी, डॉ. मनस्वी यादव, डॉ. अश्विनी मोरे, डॉ. अश्विनी जाधव यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper