Breaking News

वारकर्यांच्या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात; 19 जण जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी

आंबेनळी घाटात शनिवारी (दि. 9) सकाळी एका वळण उतारावर वारकर्‍यांची मिनीबस आंब्याच्या झाडावर धडकली. या अपघातात पंढरपूर येथून परणारे 19 प्रवासी जखमी झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते परतत असताना त्यांची मिनीबस (एमएच 04-एफएक्स 1632) शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आंबेनळी घाटात आड व कुंभळवणेदरम्यानच्या वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.

या अपघातात सहदेव विठू साळवी, गंगाराम गणपत साळवी, शिवाजी शेलार, जयवंती गंगाराम साळवी, शेखर काशिराम कदम, महादेव तुकाराम साळवी, परशुराम बाळाराम कदम, देवजी गोपाळ साळवी, चालक नितेश सावंत, वसंत साळवी, प्रतिभा कदम, प्रणाली साळवी, शांता साळवी, प्रमिला साळवी, पार्वती साळवी, चंद्रभागा कदम रोहिणी काजारे, अनिता काजारे, तुकाराम काशिराम काजारे असे एकूण 19 प्रवासी जखमी झाले. जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून यापैकी सहदेव साळवी, पार्वती साळवी, शांता साळवी, प्रतिभा कदम, आणि चालक नितेश सावंत यांना गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मिंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व आवश्यक मदत केली.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply