उरण : वार्ताहर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे शेकाप उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 22) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, शहर अध्यक्ष कौशिक शाह, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, मिलिंद पाटील, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, जितेंद्र पाटील, विनय पाटील, योगेश पाटील, संध्या पाटील, जसिम गॅस, माजी नगरसेवक राजेश कोळी, हितेश शाह आदी उपस्थित होते. याआधी पनवेल येथे झालेल्या कार्यक्रमात पागोटे ग्रामपंचायत सदस्य वनिता जगदीश पाटील, हर्षाली निलेश पाटील, कामिनी किरण तांडेल, प्रदीप गोसावी पाटील यांनी भाजपत प्रवेश केला होता, तर गुरुवारी उपसरपंच मिलिंद तांडेल, सदस्य रश्मी राकेश म्हात्रे, मिता किरण पंडित यांच्यासह कार्यकर्ते आशिष तांडेल, मनीष तांडेल, सुभाष ठाकूर, भालचंद्र तांडेल, विक्रांत पवार, कल्पेश तांडेल, प्रसाद तांडेल, साहिल तांडेल, दिनेश पाटील, आकाश तांडेल, कानेश म्हात्रे, रवी तांडेल, साईश तांडेल, सिद्धी पाटील, प्रफुल्ल पवार, नितेश पाटील, साईराज मंडल आदींनी ‘कमळ’ हाती घेतले.