Breaking News

माणगाव म्हसेवाडीत वृद्धेला लुटून हत्या

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथील एका वृद्ध महिलेचे दागिने ती एकटीच घरात राहत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लुटून तिची घरातील पाण्याच्या टपात तोंड बुडवून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता श्रीरंग सावंत (वय 69) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबई येथून त्या महाशिवरात्रीसाठी आपल्या म्हसेवाडी येथील घरी आल्या राहण्यासाठी आल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्या एकट्या असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्या महिलेला लुटून तिची पाण्याच्या टपात बुडवून हत्या केली. काही वेळानंतर शेजारील लोक आजीचा आवाज येत नाही म्हणून पहायला आले असता हा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती कळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे सहाय्यक  निरीक्षक मोहिते, उपनिरीक्षक अस्मिता पाटील, हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील, लालासाहेब तोरणे, तुणतुणे, नाईक खिरिट, पोलीस पाटील प्रदीप म्हामुनकर यांच्यासह  तातडीने घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू केला आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply