दुबई : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन-डे क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यानंतर भारतीय संघ एकही वन-डे सामना खेळलेला नाहीये. तरीही आपल्या आधीच्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही भारतीय खेळाडू अग्रस्थानी आहेत.
फलंदाजीत भारतीय कर्णधार विराट कोहली 895 गुणांसह पहिल्या, तर रोहित शर्मा 863 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता शिखर धवन 19व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय संघात इतर फलंदाजांची कामगिरी हा आगमी काळात चर्चेचा विषय ठरू शकतो.
दुसरीकडे गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 797 गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. याव्यतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादव 12व्या, युझवेंद्र चहल 14व्या आणि भुवनेश्वर कुमार 15व्या स्थानावर आहे. बांगलादेश दौर्यानंतर विंडीजच्या आगामी भारत दौर्यात भारत वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.