Breaking News

पाच लाखांचे मोबाइल जप्त, शहर पोलिसानी केली चार जणांना अटक

पनवेल : बातमीदार

शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणार्‍या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाईल व 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भीम कमान बिस्टा (25, कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (32, नवीन पनवेल), चकरा ऊर्फ चरण बहादुर रतन शाही (25, पुणे), रमेश भवन रावल (30, कल्याण) यांना अटक करण्यात आली. पनवेल शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे 3 नोव्हेंबर रोजी तळमजल्यावरील शटरचे लॉक तोडून चोरांनी दोन लाख 28 हजार 900 रुपये व पाच लाख 48 हजार 973 रुपयांच्या 33 मोबाईलची चोरी केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार विजय आयरे, बाबाजी थोरात, रवींद्र राऊत, पोलीस नाईक राजेश मोरे, अमरदीप वाघमारे, पोलीस शिपाई यादवराव घुले, सुनील गर्दनमारे व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना अटक केली. यातील तीन आरोपी सोसायट्यांमध्ये वॉचमेन म्हणून काम करत असून, चरण बहादूर हा हॉटेलमध्ये कुकचे काम करत आहे. आरोपीकडून चार लाख 89 हजार 833 रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 29 मोबाईल व 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. घरफोडी करतानाची हत्यारे (कटावणी) देखील जप्त केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply