पनवेल : वार्ताहर
क्रांती ज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधून बालसुधारगृह कर्जत या ठिकाणी असलेल्या मुलांना कपड्यांचे वाटप संस्थेच्या वतीनेे करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे सदस्य राहुल गुप्ता यांचा वाढदिवस सुद्धा या बालसुधार गृहातील मुलांच्या साथीने साजरा करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहर्यावर आनंद व हसू दिसून आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रूपाली शिंदे, उपाध्यक्षा नंदिनी गुप्ता, खजिनदार किरण अडागळे, सदस्या शुभांगी पवार, राहुल गुप्ता, आदेश कदम आदींनी विशेष मेहनत घेतली. त्या सर्वांचे आभार बालसुधारगृहातील अधिकार्यांनी मानले.