पनवेल : बातमीदार
श्रीलंकेत झालेल्या कराटे स्पर्धेत खोपोली येथील युगल चौधरी याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रीलंका येथे इंडिया नेपाल श्रीलंका कराटे चाम्पियन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खोपोली येथील आनंद स्कूल शाळेतून देवन्हावे येथील इयत्ता नववीत शिकणारा युगल जगदीश चौधरी (14) याला या कराटे स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. त्याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी देखील युगल याने अनेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहेत. या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.