Breaking News

‘त्या’ नराधम पित्याकडून दुसर्या मुलीवरही लैंगिक अत्याचार

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुक्यातील उलवे भागात राहणार्‍या एका नराधम पित्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच याच नराधम पित्याने आपल्या दुसर्‍या मुलीवरदेखील लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

उलवे भागात राहणार्‍या या नराधमाच्या पत्नीचे निधन झाल्याने तो आपल्या तीन मुलींसोबत उलवे भागात राहण्यास होता, मात्र वयात येत असलेल्या आपल्याच मुलींवर त्याची वाकडी नजर पडली. त्याने काही महिन्यांपासून आपल्या सर्वांत लहान असलेल्या 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर टावून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न सुरु केला होता, मात्र पीडित मुलीने त्याला विरोध करुन पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर नराधम बापाने या मुलीला लाकडी बांबूने जबर मारहाण केली होती. त्यामुळे मुलीने घरातून बाहेर पळ काढत नेरूळ रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीकडे विचारपूस केल्यावर वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली. एनआरआय पोलिसांनी नराधम बापावर विनयभंग आणि पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन 25 मार्च रोजी त्याला अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीच्या दुसर्‍या मुलींकडे विचारपूस केल्यानंतर त्याच्या मोठ्या मुलीनेदेखील तिच्यावर वडिलांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. घाबरुन या प्रकाराची माहिती कुणाला दिली नसल्याचे तिने सांगितल्यानंतर एनआरआय पोलिसांनी नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply