Breaking News

हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती

  • मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
  • आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी

पनवेल : रामप्रहर वृत्त
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 31 मार्च 2008च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्‍या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय करण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयाचा हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणार असून या संदर्भात आमदार महेश बालदी यांची मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे.
120 अश्वशक्तीवरील इंजिन क्षमता असणार्‍या नौकांना डिझेल कोटा व प्रतिपूर्ती मंजूर करण्याबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची विनंती उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी केली होती. त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या निर्णयात योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्‍या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय करण्यात आला आहे.
या सुधारणा 31 मार्च 2008पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेल्या असून या संदर्भातील पत्र राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार महेश बालदी यांना दिले असून सोबत मत्स्यव्यवसाय विभागाचे 14 नोव्हेंबर 2022चे शुद्धीपत्रकही देण्यात आले आहे. या वेळी मोरा सोसायटीचे माजी चेअरमन जयविंद्र कोळी, सूर्यकांत (बबलू) कोळी आदी उपस्थित होते. मच्छीमारांच्या हितासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाबद्दल मच्छीमार संघटनांनी मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply