शिबिरात 300 विद्यार्थ्यांची दंत तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे आगरी शिक्षण संस्थेच्या शाळेत विघ्नेश्वर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डेंटल चेकअप कॅम्प आणि पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या डेंटल कॅम्पचे उद्घाटन रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सोनल तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पोळ फाऊंडेशन डेंटल कॉलेजच्या विद्यार्थिनी डॉ. स्नेहा जेठवणी, डॉ. धनश्री ठाकूर, डॉ. उदिता शर्मा, डॉ. श्रुती सिंग, डॉ. शिक्षा सिंग, डॉ. निमिषा सिंग, डॉ.श्रेया सावंत व डॉ. जानव्ही पाटील यांच्यामार्फत या शिबिरात 300 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. येथे दुपारच्या सत्रात पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी यामध्ये 168 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. दरम्यान, याप्रसंगी आगरी शिक्षण संस्था शाळेच्या चेअरमन श्रुती म्हात्रे यांच्यासह रोटरीच्या अध्यक्षा प्रिया पाटील, सचिव सायली सातवळेकर, माजी अध्यक्ष अर्थतज्ञ रो. जे. डी. तांडेल, माजी अध्यक्ष रो. भगवान पाटील, रो. डॉ. संजीवनी गुणे, रो. मेधा तांडेल, रतन खरोल, पूजा खरोल, रो. ऋषी बुवा, रो. विक्रम कैया, रो. दीपक गडगे, सुदीप गायकवाड, ज्योती गडगे, पूजा वनगे यांच्यासह सेकंडरी शाळेचे मुख्याध्यापक भगत सर, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा तांडेल आणि इतर वर्गशिक्षक तसेच शिक्षिका उपस्थित होत्या.