कोलकाता : डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवडाभरापासून संपावर गेलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत ममता यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. बैठकीला सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. (संबंधित वृत्त पान 2 वर..)
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …