पनवेल : वार्ताहर
भारती विद्यापीठ मेडीकव्हर रूग्णालयाद्वारे सीकेटी महाविद्यालयात उलवे, पनवेल परिसरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी शिक्षक, इतर कर्मचारी तसेच वयोवृध्द मोठ्या संख्येने सहभागी होऊन हदय, रक्तदाब, सांधेधुखी, बीएमआय, नेत्र तपासणी व चष्मे वाटप करून आवश्यक रुग्णांना तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
या वेळी अनेक नागरिकांमध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण अति असल्याचे दिसून आले, तर सांधेदुखीचा त्रास तसेच हाडे ठिसूळ झाल्याचे तपासणीअंती आढळून आले. ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे रक्तदाबाचे आजार त्याचप्रमाणे नेत्र तपासणीत नेत्रदोष आणि मोतीबिंदू विकार असल्याचे निदर्शनास आले. या शिबीराचे आयोजन सीकेटी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांचे विशेष सहाय्य लाभले.