Breaking News

फसवणूक करणारा टेम्पोचालक गजाआड

पनवेल : वार्ताहर

कर्नाळ खिंडीतून जात असताना दोन मोटरसायकलस्वारांनी लुटले असल्याची तक्रार टेम्पोचालकाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली होती. यामध्ये त्याने पाच लाख 75 हजार रुपये लुटले अल्याचेही सांगितले होते, मात्र पोलिसांनी हा सगळा बनाव उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले आहे.

पनवेलजवळीस कर्नाळा खिंडीत जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार करुन फसवणूक करणार्‍या टेेम्पोचालकाचा बनाव पनवेल तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. टेम्पोचालक जैसराज यादव हा कर्नाळा घाटातून जात असताना पाठीमागून येणार्‍या दोन मोटरसायकल स्वारांनी त्यांचा टेम्पो आडवला व ड्रायव्हर केबीनमधून पाच लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाइल असा एकूण पाच लाख 76 हजार 600 रुपयांचे सामान लुटून नेले असल्याची तक्रार तालुका पोलीस ठण्यात केली होती.

यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  सखोल तपास सुरू करून या  परिसरातील सीसीटीव्ही फुटेजतपासले. यामध्ये टेम्पोचालकाने सांगितलेल्या वेळेत कोणतीही मोटरसायकल गेली नसल्याने आढळून आल्याने टोम्पोचालकाला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने खोटा गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply