Breaking News

‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक मोहिमेचा लाभ घ्या’

अलिबाग :  जिमाका

ग्रामीण भागातील, तळागाळातील प्रत्येक ग्रामस्थाला डिजीटल बँकेचे व्यवहार समजावेत आणि तोही या प्रवाहात सामील व्हावेत,  यासाठी भारतीय रायगड डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) च्या सहाय्याने ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचण्याची मोहीम सुरु केली आहे. या पोस्ट पेमेंट बँकेची माहिती अधिकाधिक जनतेपर्यंत पोचवा, असे प्रतिपादन जिल्हा डाक अधिक्षक उमेश जनवाडे यांनी केले आहे.

आधुनिक तंत्रप्रणाली असणारी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारतीय डाक विभागासोबत कार्यरत असल्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्टया सक्षम करता येणे आत सोपे झाले आहे. रायगड विभागातील पाच हजार 750 ग्राहकांनी या पोस्ट पेमेंट बँकेत खाती उघडली आहेत. या मोहिमेचा अधिकाधिक जनतेने घ्यावा.

-उमेश जनवाडे, जिल्हा डाक अधीक्षक, रायगड

ग्राहकाला घरबसल्या मिळणार अत्यावश्यक सुविधा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. खाते शून्य रकमेद्वारे उघडता येत असले तरी 30 दिवसांत रु. 100/- भरणा करुन हे खाते चालू ठेवता येते.  या खात्यामधून विद्युत बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, इतर ठिकाणी पैसे ट्रान्स्फर करणे यासारख्या अत्यावश्यक सुविधा ग्राहकाला घरबसल्या मिळतात.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply