Breaking News

चिंचवली येथे जागेच्या वादातून हाणामारी

नवरा-बायको दोघेही जखमी, चार जणांवर गुन्हे दाखल

कर्जत : बातमीदार

नेरळ – कर्जत या दोन्ही शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले चिंचवली येथे जुन्या जागेच्या रागातून वाद निर्माण झाला. हा वाद  विकोपाला जावून झालेल्या हाणामारीत नवरा, बायको दोघेही जखमी झाले आहेत. तर मारहाण करणार्‍या चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जत तालुक्यातील एकसळ येथील मारुती चंदर रेवाळे व त्यांच्या पत्नी अनिता मारुती रेवाळे  या दाम्पत्याची व कडव कुटुंबाची चिंचवली येथे जमिन (सर्वे नं 30/1/ब) आहे. या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरु आहेत. याच दरम्यान रविवारी (दि. 24) हरेश जनार्दन कडव हे जमिनीत नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात होते. तेव्हा अनिता रेवाळे यांनी ट्रॅक्टर कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा केली. त्याचा राग येउन हरेश कडव व इतर तिघे यांनी संगनमत करून अनिता रेवाळे व मारुती रेवाळे या दाम्पत्याला जबर मारहाण केली. त्यात अनिता रेवाले यांच्या हाताला तर मारुती रेवाळे यांच्या छातीवर लाकडी दांडक्याने प्रहार केल्याने दुखापत झाली आहे. याबरोबर रेवाळे यांचा मुलगा केतन यालादेखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी रेवाळे कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीनुसार हरेश जनार्दन कडव, गिरीश जनार्दन कडव, पंढरीनाथ श्रीपाद कडव, राजेश पंढरीनाथ कडव यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply