Breaking News

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी 82 अप आणि 82 डाऊन अशा एकूण 162 विशेष गाड्या धावणार आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरी अशा या ट्रेन धावतील. 15 ऑगस्टपासून या ट्रेनचे बुकिंग सुरू होणार आहे. कन्फर्म तिकीट असणार्‍यांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. प्रवाशांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply