Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पनवेलच्या सौंदर्यात पडणार भर

पनवेल : रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पनवेल शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, एकूण 22 शिल्प उभारण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी येथील महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील व सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी करून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौकात  सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.
रयतेला लेकराप्रमाणे मानणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महान युगपुरुष होते. अशा वंदनीय श्रद्धास्थानाचा इतिहास शिवप्रेमींनाबरोबरच समस्त तरुणाईला प्रेरणादायी ठरावा यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याविषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. आता महाराजांच्या पुतळ्याजवळील सुशोभीकरणाला वेग आला असून, येत्या काही दिवसांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊन पनवेलच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply