Breaking News

कोरोनाबाधित विद्यार्थ्याने दिली रुग्णालयातून परीक्षा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 13 वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणार्‍या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (13) यांना कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेरा वर्षीय मुलगा निरंजन कोपरखैरणे येथील एका खाजगी शाळेत आठवीत (सीबीएसई) शिकत असून नेमकी त्याची ऑनलाइन परीक्षा याच वेळी होती. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे आपण ही परीक्षा देऊ शकणार नाही या कल्पनेने तो थोडासा नाराज होता. त्याने ही खंत तेरणा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे बोलून दाखविली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याने निरंजनला ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी रुग्णालय सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून निरंजनसाठी वॉर्डमध्ये परीक्षेसाठी टेबल-खुर्ची तसेच वायफाय इंटरनेट व लॅपटॉप देण्यात आला. निरंजननेही कोरोनाला न घाबरता सलग चार दिवस परीक्षा दिली. त्याला या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply