Breaking News

स्टीव्ह स्मिथचा विक्रम; सर्वांत जलद सात हजार धावा

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. 30 वर्षीय स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत सात हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे.

स्मिथने त्याच्या 70व्या कसोटी सामन्यातील 126व्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद मूसाच्या चेंडूवर धाव घेत वॉल्टर हॅमंड यांचा 73 वर्षे जुना विक्रम मोडला. इंग्लंडच्या या माजी फलंदाजाने 1946 साली भारताविरुद्ध ओव्हलवर हा विक्रम केला होता. हॅमंडने 131 कसोटी सामन्यांत सात हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. सेहवागने 79 सामने आणि 134 डावांमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. गॅरी सोबर्स, कुमार संगकारा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 138 डावांत हा टप्पा गाठला आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply