पनवेल ः प्रतिनिधी
खबरबात तसेच खमंग मेजवानी या कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार सुमंत नलावडे यांच्या वेबसाइट विश्वातील एक नवी संकल्पना असलेल्या
ुुु.ज्ञहरलरीलररीं360.लेा या वेबसाइटचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. 1) सकाळी खारघरमधील इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
ही वेबसाइट विश्वातील अनोखी अशी 360 डिग्रीतून आजूबाजूच्या प्रत्येक चित्राला मोबाइलच्या स्क्रीनवर बोट सरकवून पाहता येणार आहे. समोर दिसणार्या प्रत्येक चित्रात आपण स्वतःलाही पाहू शकतो अशी कॅमेर्याची कमाल या वेबसाइटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या देशातील हा पहिलाच प्रयोग असून, रविवारी सकाळी इस्कॉन मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी वर्षाताई ठाकूर, राधाकृष्ण मंदिराचे डॉ. सूरदास, ‘खासबात’चे नाझनीन शेख, विजय पवार, खमंग मेजवाणीच्या अँकर राधिका (गौरी) परदेशी, संपादक सुमंत नलावडे आदी उपस्थित होते. वेबसाइटचे संपादक सुमंत नलावडे यांनी या 360 डिग्रीमधील कॅमेरा आणि यातून साकारणार्या अनोख्या चित्रकौशल्याची कमाल याबाबत माहिती देऊन ही अनोखी वेबसाइट बनवण्याचे अवघड काम नाशिकच्या मंगेश ठाकूर यांनी केल्याचे सांगितले.
या वेळी पत्रकारांना 360 कॅमेर्यात चित्रीकरण केलेले व्हिडीओ व छायाचित्र व त्यातील अनेक नावीन्याची माहिती सुमंत नलावडे यांनी दिली. जगातील वेबसाइटच्या विश्वात अनेक वेबसाइट आहेत, मात्र 360 अंशांतून चित्रीकरण असलेल्या फारच कमी असून महाराष्ट्रात हा पहिलाच प्रयोग असल्याचे सुमंत नलावडे यांनी सांगितले. पत्रकारांनी सुमंत नलावडे यांचा वेगळ्या वाटेचा प्रवासी म्हणून गौरव करून त्यांचे हे काम पत्रकारांसाठी भूषणावह असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. या वेळी पनवेल पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर, कर्नाळाचे संपादक मंदार दोंदे, विवेक पाटील, वैभव गायकर, दीपक घरत, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, नितीन देशमुख, कटेकर, पत्रकार कुणाल लोंढे, रत्नाकर पाटील, दीपक घोसाळकर आदी उपस्थित होते.