Breaking News

पनवेलमध्ये क्रिकेट सामन्यांची धूम

पनवेल ः प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यात ग्रामीण क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जय हनुमान क्रिकेट संघ चिखले आयोजित सरपंच चषक, ओम साईराम क्रिकेट क्लब रिटघर आयोजित आमदार चषक आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी रविवारी

(दि. 1) या सामन्यांना भेट दिली. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश पाटील, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव पाटील, चिंध्रण पंचायत समितीचे युवा मोर्चा सरचिटणीस पद्माकर म्हसकर, वाकडी ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप पाटील, नेरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगन पाटील, सुनील पाटील, नामदेव जगदाळे, बबन वाघ, विष्णू भगत, वासुदेव भोपी, नाथा पाटील, प्रल्हाद भोपी यांसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी पनवेल तालुकाअध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply