Wednesday , February 8 2023
Breaking News

कानसा वारणा फाऊंडेशन सन्मानित

मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे कुलाबा प्रभात वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले. यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्य करणार्‍या कानसा वारणा फाऊंडेशन या संस्थेच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबळे, पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, माजी सभापती कांचन पारंगे, ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे, ज्येष्ठ साहित्यिक परशुराम माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कानसा वारणा फाऊंडेशनने दरीखोर्‍यांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले असून विविध ठिकाणी आरोग्य शिबिर, बंदिजनांसाठी कार्यशाळा, गोरगरिबांना मदत करण्याचे काम फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील करीत आहेत. त्यांच्या फाऊंडेशनला याअगोदरही सामाजिक कार्याबाबत अनेक पुरस्कार मिळाले असून कुलाबा प्रभातकडून विशेष सन्मानार्थ गौरविल्याने फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply