Breaking News

वादळी पावसामुळे ग्रामीण भाग अंधारात

पनवेल : बातमीदार

बुधवारी  झालेल्या वादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विज रात्रभर गायब झाली होती. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यासह शेकडो झाडे कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंद झाले होते.

दुपारी चारच्या सुमारास पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वार्‍याला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेचे खांब तारा खाली कोसळल्या. झाडे रस्त्यावरून पडल्याने रस्ता देखील बंद झाले होते. तालुक्यातील वाजे, टेमघर, सुकापुर, आकुरली आदी परिसरातील झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तर केबल, नेटच्या वायरी देखील तुटलेल्या अवस्थेत खाली पडून आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. वायरमन आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही झाडे कापून रस्ता पूर्ववत करण्यात आला. वादळी वारा आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सोसाट्याच्या वार्‍यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात खूप मोठे नुकसान झाले आहे.

जोरदार वारे वाहत असल्याने काहींच्या घरांचे नुकसान झाले. तर वार्यासह पाऊस आल्याने काहींच्या घरात पाणी साचले होते. पावसामुळे वीज गायब झाली आहे. या वेळी काम सुरू असल्याचे उत्तर महावितरणकडून देण्यात आले आहे.

-जनू महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती बुधवारी नवी मुंबई, पनवेलसह उरण मध्ये पहायला मिळाली. दुपारी वादळी वार्‍यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे शेकडो झाडे कोसळली. इमारतीवरील पत्रे, तसेच वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तो दुसर्‍या दिवसापर्यंत पुर्ववत झाला नाही.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply