Friday , September 29 2023
Breaking News

पनवेल मनपा हद्दीत 96 कोटींची विकासकामे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजने

पनवेल : प्रतिनिधी

सबका साथ, सबका विकास म्हणजे शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचला पाहिजे त्यासाठी विकासाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तर जनसामान्यांचा फायदाच होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना पाहायला मिळत असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 2) पनवेल येथे सांगितले. 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील,  सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, राजू सोनी, सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, नगरसेवक नितिन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, पं. स. सदस्या रत्नाताई घरत, शहराध्यक्ष जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ  आणि नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी शाळा बंद होत असताना नवीन मराठी शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर आणि नगरसेवकांचे मी कौतुक करतो,  अशा शाळेच्या पाठीमागे तिची जवाबदारी  स्वीकारण्यास शासन उभे राहील. याबरोबरच महापालिकेत आलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही वर्ग करून घ्याव्यात.

-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

नागरिकांना काय हवे ते पाहिले की लोक मदतीला येतात,  महापौर आणि आयुक्तांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. विरोधी पक्षाच्या प्रभागातील कामांना प्राधान्य  देऊन सुरुवात केलीत हे चांगले आहे. असेच राहू द्या.

-लोकनेेते रामशेठ ठाकूर

पालकमंत्र्यांचा आदर्श घेऊन काम करताना त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विकासाकडे झेपावत आहोत. तीन महिन्यांत 100 कोटीपेक्षा जास्त कामे करताना राजकारण केले नाही. आपण नगराध्यक्ष असताना प्रस्ताव केलेल्या एकत्रित तीन शाळांच्या कामाचा शुभारंभ होतोय.

-आमदार प्रशांत ठाकूर 

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply