Breaking News

आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयएनएक्स मीडियाप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 4) काही अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे ते तब्बल 106 दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात आमच्याविरोधात चुकीचे खटले दाखल करण्यात आले होते, असे म्हटले आहे.

ना. गडकरी म्हणाले की, आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते तेव्हा माझ्याविरोधात चुकीचे खटले दाखल केले. एवढेच नाहीतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधातही चुकीचे खटले दाखल केले होते. नंतर आम्हा सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. चिदंबरम यांच्याविरोधात असलेल्या खटल्याती पुरावे आहेत. तपास सुरू आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे. त्या ठिकाणीच यावर निर्णय होईल, असेही गडकरींनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply