मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईच्या दादर येथील कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी ग्रंथसंग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
हे प्रकाशन पद्मश्री व ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते व कोमसाप कार्याध्यक्ष नमिता कीर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे डॉ. कृष्णा नाईक, कोमसाप उपनगरचे अध्यक्ष शिवाजी गावडे, कोमसाप दादरचे अध्यक्ष सूर्यकांत मालुसरे, प्रा. पंढरीनाथ रेडकर, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे करण्यात आले.
या वेळी सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. कृष्णा नाईक, शिवाजी गावडे, सूर्यकांत मालुसरे, प्रा. पंढरीनाथ रेडकर, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळे यांनी केले. गौरी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व मनोज धुरंधर यांच्या सूत्रसंचालनाखाली अनुराधा नेरूरकर, शांतीलाल ननावरे, बाळासाहेब तोरसकर, निमा चिटणीस, अंजना कर्णिक, गुरुदत्त वाकदेकर, निरंजन जोशी, चंद्रकांत कवळी, विद्या प्रभू आदी मान्यवर कवी-कवयत्रींच्या उपस्थितीत काव्यसंध्याचा कार्यक्रम झाला.