पनवेल ः वार्ताहर
पनवेल महापालिका व ब्रह्माकुमारीजतर्फे फडके नाट्यगृहामध्ये 7 व 8 डिसेंबरला मोफत डायबिटीज मार्गदर्शन शिबिर होणार आहे, या निमित्ताने पनवेलच्या हुतात्मा स्मारक गार्डन येथे गुरुवारी (दि. 5) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पनवेलमधील नामांकित पत्रकारांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच शिबीराची माहिती तारादीदी व डॉ. शुभदा नील यांनी दिली. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा घ्यावा, असे आवाहन डायबिटीज फ्री फिट इंडिया हेल्दी इंडिया, अलविदा डायबिटीज कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कीर्ती समुद्र व डॉ. शुभदा नील यांनी केले आहे.