Breaking News

डेरवलीत श्री दत्तजयंती उत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील डेरवली या गावात बुधवारी (दि. 11) श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे. उत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 2 ते 4 वाजता सेवासूर्य किसन महाराज हरिपाठ मंडळ कळंबोली, ओवळा गायिका कविता वाघ, जिजा जांभले मृदुंगमणी साईनाथ भगत कळंबोली, बबन मुकादम शिरढोण, ह.भ.प. पांडुरंग बडे सुकापूर, सायंकाळी 4 ते 6 वाजता श्रीकृष्ण हरिपाठ मंडळ डेरवली, बुवा ह.भ.प. नंदकिशोर पांडुरंग पाटील, गणेश नामदेव पाटील, 7 ते 9 वाजता श्री संत सेवा एकादशी मंडळ, मोहो, ता. पनवेल किर्तन लक्ष्मण महाराज मोहोकर यांचे किर्तन गायनसाथ मुक्ताबाई संजय पाटील, वारदोली, पुजाबाई ज्ञानराज म्हस्कर, हेमंत दुर्गे, शेडुंग मृदुंगमणी अरविंद म्हस्कर महाराज देवाची आळंदी,  रात्री 9 ते 10 वाजता श्री हनुमान प्रासादीक भजन मंडळ कोळखे बुवा-बाबुराव लक्ष्मण पाटील, तुकाराम धाऊ पाटील, नारायण हिरु मुंढे, संजय मुंढे, नारायण पदु मुंढे, सावळाराम गणू पाटील, मर्‍या पांडुरंग मुंढे, संजय हिरु जाधव, विवेक गोमाजी जितेकर, दिनकर मारूती मुंढे, मर्‍या पांडुरंग मुंढे, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ  कोळखे हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन, महाप्रसादाचा व श्रवण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक हरिश्चंद्र पाटील व विजया पाटील यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply