पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथे आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, विकास घरत, राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, तसेच अशोक मोटे, रवी जोशी, राजेंद्र बनकर, संदीप भगत, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर आदी उपस्थित होते.