Sunday , February 5 2023
Breaking News

मेढेखार येथे कबड्डी स्पर्धा

श्रीगाव : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 14 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 21 हजार रुपये व स्व. नथुराम तुरे स्मृतिचषक, द्वितीय 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी 10 हजार रुपये व चषक देण्यात येतील, तसेच उत्कृष्ट चढाई, पकड, खेळाडू यांना बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग, तसेच अधिक माहितीसाठी अक्षय म्हात्रे (9168026227), महेश पाटील (8407971069), स्वप्नेश पाटील (9823454333) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply