Breaking News

हॉकीत नॉर्थ सेक्टर विजेते

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटी टाऊनशीप येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटर हॉकी स्पर्धेत नॉर्थ सेक्टर टीमने विजेतेपद पटकाविले, तर एअरपोर्ट सेक्टर टीम उपविजेती ठरली.

जेएनपीटी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयसीएफ)च्या वतीने टाऊनशीप मैदानावर सहाव्या  इंटर सेक्टर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला. अंतिम फेरीचा सामना नॉर्थ सेक्टर विरुद्ध एअरपोर्ट सेक्टर यांच्यात झाला. या चुरशीच्या सामन्यात नॉर्थ सेक्टरने एअरपोर्ट सेक्टरवर 2-1ने विजय प्राप्त करून विजेतेपदाला गवसणी घातली. दोन्ही संघांना सिव्हीओ अनिल रामटेके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभास वरिष्ठ कमांडट विष्णू स्वरूप, अमित कपूर, मोहम्मद हनिफ, रमेशचंद्र यादव, ए. के. सिरोही आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply